*
रंजाणे, ता. शिंदखेडा, दि. 29 : (रवी शिरसाठ)*
शिंदखेडा तालुक्यातील रंजाणे ते विरदेल या ७ k.m की.मी.आतंराच्या रस्त्याच्या दोन्हीही बाजुला झाडे-झुडप्यांचे अतिक्रमण वाढल्याने अपघाताचा धोका वाढला आहे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अडचणीचे ठरत आहे तरी संबधीत विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढणे गरजेचे आहे, या बाबत वेळोवेळी दैनिकात वृत्त प्रसारित केले पण आज पावेतो कुठलेही काम करण्यात आले नाही, याच गलथानपणा मुळे रंजाणे ते विरदेल रस्त्यावर मोटारसायकल स्वरास डोळ्यात काटेरी झुडपे लागल्याने दुखापत झाली आहे, व आपघातही होत असतात तरी संबधीत विभागाने रंजाणे ते विरदेल दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढणे गरजेचे आहे जेणेकरुन वाहन चालकांना सुरक्षित प्रवास करता येईल , अशी मागणी रंजाणे व जसाणे येथील वाहन चालक व नागरिकांकडुन होत आहे,रस्ता रंजाणे.जसाणे. विरदेल ह्या परिसरातील सोयीचा असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत ती बर्याच दिवसापासून तोडलेली नाही त्या मुळे वाहनचालकांना वळणावर समोरून येणारी वाहणे दिसत नाही परिणामी छोटे मोठे आपघात होत आहे तरी संबधीत विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे, आशा अशयाचे निवेदन आदिवासी कोळी समाज समन्वय समिती चे खांदेश विभाग उपाध्यक्ष रविभाऊ शिरसाठ व तालुका युवा अध्यक्ष संदिप येळवे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोंडाईचा ला दिले आहे