*यवतमाळ दि.२८ (शेख साजित) -:* भारतीय नारी रक्षाम संघटनेचे संयोजक व संकल्प फाउंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख एस.एम.न्युजचे संपादक सुकांत प्रकाश वंजारी यांनी लाॅकडाऊनच्या काळात कोरोणा विषाणुचा प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या नागरिकांना जिवनावश्यक वस्तुची मदत केली,यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यवतमाळच्या वतिने त्यांना श्रम समिधा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी बाविस्कर उपविभागीय पोलीस अधिकारी,तर प्रमुख पाहुणे म्हणून तोताडे साहेब सेवानिवृत्त अभियंता,संघचालक विजय कोषटवार,संघचालक प्रदिप वडनेरकर यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा पार पडला.
शतकातल्या सर्वात मोठ्या संकटाशी आज ही जग झुंजतंय.विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलेली प्रचंड प्रगती सुद्धा खुजी,तकलादू वाटावे असे अकल्पित वातावरण,दुखात,संकटात लोक एकत्र येतात,आजारपणात रुग्णाला धीर द्यायला उशाशी बसतात, मायेने वत्सलतेचा हात फिरवतात,असाच आजवरचा अनुभव इथे तर सख्खे, सगेसोयरे देखील परस्परांपासून जावेत तर असा रोग भयंकर !
साधी विचारपूस करायला जाऊ की नको
अशा संभ्रमात आपलेच आप्तस्वकीय दिसतायेत.
याही काळात सहकार्याचा एक हात नक्कीच पुढे येत असतो.तो असतो संकटांशी दोन हात करण्याची मानसिकता असणाऱ्यांचा अडचणीत असलेल्याची नेमकी गरज ओळखून हवे ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जिद्दीने उभा ठाकणारा कोरोणा योद्धा.कोरोना महामारीशी लढताना माणुसकीच्या अभेद्य भिंतीचा एक भक्कम चिरा ! सेवारुपी यज्ञकुंडात श्रमसमिधा अर्पण करणाऱ्या आपल्या हातांना नि त्यामागच्या इच्छाशक्तीला सन्मानित करताना आम्हाला येतोय अनुभव धन्यतेचा ! अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतिने श्रम समिधा सन्मान पत्र सुकांत वंजारी यांना सन्मानित करण्यात आले.
प्रशासन मित्र तथा संपादक
सुकांत वंजारी यांनी भारतीय नारी रक्षा संघटना व संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना वेळोवेळी मदत केली त्यामध्ये ज्यांचे लाॅकडाऊनमुळे व्यवसाय,मजुरी बंद असलेल्यांना जिवनावश्यक वस्तु,जेवण पुरविले तसेच बाहेर गावच्या व्यक्तींना रक्त मिळणे कठीण असतांना त्या स्वतः व त्यांचा पत्नीसह रक्तदान केले,लाॅकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकुन असलेल्याच्या जाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली,यासह त्यांनी भारतीय नारी रक्षा संघटना तसेच संकल्प फाउंडेशनच्या वतिने अनेक आदर्श विवाह घडवुन आणले.सुकांत वंजारी हे १५ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी भारतीय नारी रक्षा संघटनेच्या माध्यमातून विवीध उपक्रम राबवण्यात यांचे मोलाचे योगदान आहे.तसेच त्यांच्या प्रभागात प्रशासन मित्र म्हणून जबाबदारी पार पाडतांना त्यांनी त्रिसुत्रीचे पालन करण्यासंदर्भात जनजागृती केली आहे.तसेच लसीकरणासाठी कोराणा नियंत्रण प्रभाग समितीच्या माध्यमातून प्रभागात नागरिकांना प्रोत्साहीत केलेअशा विवीध कार्याची व सेवेची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यवतमाळच्या वतिने त्यांना श्रम समिधा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला विवीध स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.