चोपडा दि. 24 ( प्रतिनिधी ) :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी नानासाहेब दिनकरराव देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचेवर तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गतकालीन सभापती कांतीलाल गणपत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नुकताच दिला होता. प्रशासनाच्यावतीने मान्य झाल्याने हि नवीन निवड पार पडली. नवनिर्वाचित सभापती निवडीप्रसंगी घनःशाम अण्णा पाटील, सुनीलभाई जैन, चंद्रहासभाई जैन, गिरीश आप्पा पाटील, नारायणदादा पाटील, मावळते सभापती कांतीलाल बापू पाटील, धनंजय पाटील, भरत पाटील, प्रल्हाद पाटील, हितेंद्रभाऊ देशमुख यांचेसह महिला संचालक मंडळ हजर होते. जगन्नाथ दामू पाटील हे काही कारणात्सव हजर राहू शकले नाहीत.
माजी सभापतींचा कार्यकाळ पूर्ण झाला होता . या अनुषंगाने हा राजीनामा दिला होता . ठरलेला काळ आणि वरीष्ठांचा विश्वास हाच कार्यकर्त्यांसाठी फतवा असतो. तो जोपासणे ही निष्ठावंत कार्यकर्ते राजकीय कामाची पावती असते जे बोलतात तेच करतात अशांची खूप किंमत असते आणि राजकारणात बोलबाला असतो. याच पाश्र्वभूमीवर हा राजीनामा दिला आहे.
जेष्ठ
वरीष्ठ नेत्यांच्या आदेशाने ठरलेल्या मौखिक करारानुसार सभापती पदाचा राजीनामा जळगाव येथे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दि.२२ जून २०२१ रोजी दिला होता तो राजीनामा मंजूर झाल्याने नव्याने दिनकनाना देशमुख यांची सर्वानुमते वर्णी लागली आहे.