जळगाव दि 1 (प्रतिनिधी)
जळगाव दौऱ्यावर असताना मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आज केळींच्या बागांची पाहणी केली. वादळामुळे संपूर्ण केळीबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकही खोड जिवंत राहिलेले नाही. केळीचे हे १०० टक्के नुकसान झालेले आहे.
गुरुवारी झालेल्या वादळामुळे मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील अनेक गावात केळीचे नुकसान झाले. विटवा, ऐनपूर परिसरात गारपीट होऊन केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे करोडो रुपयांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहे. या परिसराची विरोधी पक्षणेते देवेंद्रजी फडणवीस यांनी पाहणी केली.