*समाजवादी विचारवंत,अंगमेहनती कष्टकऱ्यांचे बुलंद आवाज, कामगार नेते* *डॉ.बाबा आढावांचे 92 व्या वर्षात* *पदार्पण ....असंघटित* *कष्टकऱ्यांचे म्हातारपणाचे पेन्शन चा प्रश्न सर्व प्रथम* *ऐरनीवर आणणाऱ्या या महान* *नेत्यांविषयी अपूरे पडतील हे दोन शब्द..*
* " श्रम चोरी हा फौजदारी गुन्हा ठरवा " ही मागणी करणारे डॉ. बाबा आढाव देशातील पहिले समाजवादी कामगार नेते....!!!!
* गेली 70 वर्ष समजवादी - समतावादी विचार व मूल्यांसाठीच खर्ची घातली....
* अंगमेहनती कष्टकऱ्यांचा बाबा हे आजही बुलंद आवाज.....
* असंघटित कष्टकऱ्यांचे म्हातारपणाचे पेन्शन चा प्रश्न सर्व प्रथम ऐरनीवर आणला.......
* माथाडी कायद्यास मुंबई बाहेर आणण्यात सिंहाचा वाटा.....
गेली 70 वर्ष डॉ.बाबा आढाव ज्या विचारासाठी, ज्या समाज घटकासाठी जगले, ते आज 92 व्या वर्षात पदार्पण करीत असतांना, तो विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्धार आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत अनेकांनी मनोदया द्वारे व्यक्त केला......
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांचे अध्यक्षतेखाली झालेली ही ऑनलाईन बैठक मराठवाडा लेबर युनियन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, जय किसान आंदोलन - स्वराज अभियान, स्वराज इंडिया या संघटनांचे वतीने आयोजित केली होती......
बैठकीच्या सुरुवातीस डॉ. बाबा आढाव यांचे 92 व्या वर्षात तर ऍड. विष्णू ढोबळे यांचे 61 व्या वर्षात पदार्पण होत असतांना, *त्या दोघांनाही सर्व मान्यवरांनी आरोग्यदायी शुभेच्या दिल्या*.........
डॉ. बाबा आढाव यांनी नेहमीच समाजातील दुष्ट चालीरीती मुळे ज्यांना अमानुष पणे जगावे लागले त्यांच्या बाजूने सर्व टाकतीनिशी संघर्षासाठी उभे राहिली...... मग तो प्रश्न खेड्या पाड्यातील दलितांच्या पिण्याच्या पाण्याचा असो... त्यांनी देशातील पहिली " एक गाव एक पाणवठा " चळवळ उभी केली.....
केसात गुंता झाल्यावर बट निर्माण होते, परिणामी अशी बट झालेल्या मुलींना देवांना अर्पण करण्याची अघोरी " देवदासी प्रथा " संपवण्यासाठी देवदासी निर्मूलन चळवळ सुरु केली.....
सरकारी प्रकल्पसाठी ज्याच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या गेल्या, अशा विस्थापिताना न्याय देण्यासाठी, विस्थापितांची चळवळ उभी करून त्यांचे पुनर्वसणासाठी स्वतंत्र कायदा करायला सरकारला भाग पाडले.....
हमालासारख्या अंगमेहनती कष्टकर्यांसाठी 1969 साली माथाडी कायदा अस्तित्वात आला पण त्याला मुंबई बाहेर काढून रत्नागिरी ते गडचिरोली आणि लातूर ते नंदुरबार सर्व जिल्ह्यात पोहोंचविण्यात बाबांचा सिंहाचा वाटा असून, हा माथाडी कायदा सर्व ( 95%) असंघटित कष्टकऱ्यांना लागू व्हावा यासाठी आजही तुरुंगात जायला तयार असल्याचे ते वारंवार बोलतात.......
देशातील सर्व अंगमेहनती कष्टकऱ्यांना त्यांचे म्हातारपण सन्मानजनक जगता यावे म्हणून, सर्व कष्टकऱ्यांना हक्काची पेन्शन मिळायलाच हवी म्हणून " पेन्शन परिषदेच्या " माध्यमातून गेले दहा वर्षांपासून ते प्रयत्नात असून... त्यासाठी याही वयात देशभर फिरत आहेत......
असंघटित कष्टकऱ्यांचे दारिद्र्यचे मूळ, त्यांचे शोषणात असल्याने, *श्रमांची चोरी हा फौजदारी गुन्हा*ठरविला गेला पाहिजे अशी मागणी करणारे देशातील पहिले समजवादी कामगार पुढारी होत......
डॉ. बाबा आढाव आयुष्य भर जे विचार जगले व ज्या प्रश्नासाठी आजही संघर्षरत आहेत, त्या विचार व चळवळीचा भाग बनण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला....
आजच्या ऑनलाईन बैठकीत साथी अण्णा खंदारे ( स्वराज इंडिया ), प्राचार्य जालिंदर अडसूळ ( धुळे ), साथी भुजंग कसबे ( नांदेड ), साथी प्रकाश शिंदे ( शेतकरी शेतमजूर पंचायत ), साथी तारा मराठे ( नंदुरबार ), कॉ. श्रीकांत फोपसे ( सिटू ), साथी छगन गवळी ( मराठवाडा लेबर युनियन ), प्रा. मोहन परजने ( बीड ), ऍड. विष्णू ढोबळे ( स. ज. प. महाराष्ट्र ), ऍड पी.सी. शारदा ( नवी दिल्ली )... या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.....
शेवटी साथी प्रवीण सरकटे यांनी सर्वांचे आभार मानले व ऑनलाईन बैठकीची सांगता झाली...
..................................