देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार साहेबां नंतर लगेचच एकनाथ खडसेंच्या घरी धाव.. बंद दाराआड झाले गुप्तगू.. सदिच्छा भेटीचे आवरण



*देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार साहेबां नंतर* *लगेचच एकनाथ खडसेंच्या घरी धाव.. बंद* *दाराआड झाले गुप्तगू.. सदिच्छा भेटीचे आवरण..* 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) *माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणीसांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्या लगोलग एकनाथराव खडसे याची बंद दाराआड केलेली गुप्तगू डोळ्यांच्या भुवया उंचावणारी आहे.यामागे काही राजकीय सेटलमेंट आहे की काय? या संभ्रमात जिल्ह्यातील कार्यकर्ते खिचडी शिजवू लागले आहेत.बाहेर मात्र सदिच्छा भेट असल्याचे हवा उडत असून लवकरच काही नवीन बाब ऐकावयास मिळते का याकडे राजकीय क्षेत्रातील मंडळी काक्ष नजरेने टक लावून आहेत* 
       पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करताना सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घऱी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान त्यांनी मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या घरी जाण्याबाबत चर्चा होण्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे फडणवीस यांनी सोमवारी शरद पवारांच्या सिलव्हर ओक या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट देत एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने