चोपडा दि. 29 ( प्रतिनिधी) तालुक्यात वर्डी, नारोद, वेले आलेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी केली
आमदार लताताई सोनवणे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले. चोपडा तालुक्यातील सर्वाधिक नुकसान वर्डी गावचे झाले. यात ६० ते ७० कुटुंबीयांचे घराचे व वेले येथे घरांच्या पडझडीची पाहणी केली त्यावेळी बुधा आत्माराम पाटील, खटाबाई भिल यांच्या घराची नुकसानीची पाहणी आमदार लताताई सोनवणे यांनी केली. तसेच १०८ शेतकऱ्यांचे ७२.७० हेक्टर क्षेत्र पिकांचे नुकसान झाले. प्रामुख्याने नारोद शिवारात सर्वाधिक नुकसान झाले. प्रसंगी अनेक घरांची पत्रे उडाल्याने पावसाचे पाण्यात अन्नधान्य भिजले अशांना तात्काळ सानुग्रह अनुदान मंजूर करा शेत व गावातील ज्यांचे नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे असा आदेश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. तसेच वादळामुळे नुकसानग्रस्त भागातील पडलेले विजेचे खांब तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेशही उपस्थित महावितरणचे अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी भरत कोसोदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, महावितरण कंपनी चे एन. एस. रास्कर, एम. के. बढे, माजी उपसभापती समन्वय समिती सदस्य एम.व्ही.नाना पाटील, पी.आर. माळीसर, सुकलाल कोळी, नामदेव पाटील, सुनील पाटील, ग्रामविकास अधिकारी यहीदे तलाठी , कॄषी सहाय्यक उपस्थित होते.
या प्रसंगी माजी सभापती कांतीलाल पाटील, तालुका दक्षता समिती सदस्य निर्जलाताई पाटील, गुलाब ठाकरे, भागवत कोळी, दिलीप पाटील (पिंटू भाऊ), भोला पाटील, दत्तू पाटील, मयूर पाटील, भगवान कोळी, महेंद्र पाटील सर, मच्छिंद्र साळुंखे सर, नंदलाल धनगर, मार्तंड कोळी, पोलीस पाटील पद्माकर नाथ, वेले सरपंच वैजयंती पाटील, अशोक पाटील, संतोष नारायण पाटील , मधुकर पंडित पाटील, दीपक पाटील, प्रवीण बाविस्कर, विनोद पाटील, तलाठी श्रीमती भामरे, ग्रामसेवक जनार्धन विसावे, नारोद येथील महारु पाटील, धनराज पाटील, नवल पाटील, लक्ष्मण पाटील, रामदास पाटील, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील, अनिल पाटील, संजय पाटील यांच्या शेतातील पिकांचे नुकसानीची पाहणी केली.
यावेळी राहुल पाटील, संदीप पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र पाटील, अंकुश पाटील, नारायण पाटील, दिपक पाटील, अरविंद पाटील आदी उपस्थित होते.