✈️ देशांतर्गत विमान प्रवास 1 जूनपासून* *महागणार; विमान प्रवास दारात मोठे बदल..!नवी दिल्ली दि. 29


✈️ *देशांतर्गत विमान प्रवास 1 जूनपासून* *महागणार; विमान प्रवास* *दारात मोठे बदल..!* 
 *नवी दिल्ली दि. 29 :* 
 एकीकडे महागाईमुळे जनता हैराण असताना आता दुसरीकडे येत्या 1 जूनपासून सरकारने घरगुती विमान प्रवासात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.
नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मर्यादा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली आहे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पन्न घटलं आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर विमान कंपन्यांना मदत होणार आहे. देशातील हवाई उड्डाण कालावधीच्या आधारे विमान प्रवासाच्या भाड्याच्या कमी आणि उच्च मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
 40 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासाचे साधारण भाडे हे 2,300 रुपये इतके असते. मात्र आता त्यात 13 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना 40 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासासाठी 2600 खर्च करावे लागणार आहेत.तर 40 मिनिटांपासून 60 मिनिटांपर्यंत विमान प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 2,900 रुपयांऐवजी 3,300 रुपये मोजावे लागतील.
दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं आता 30 जूनपर्यंत रद्द ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती DGCA कडून देण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने