कैलास बाविस्कर यांची अशासकीय सदस्यपदी तालुका समन्वय पुनर्विलोकन समितिवर नियुक्ती : अन्य 4 जणांचा तर महिला गटातून 3 महिला सदस्यांचा समावेश




 
चोपडा दि. 29 (प्रतिनिधी)पाणी पुरवठा व स्वच्छता राज्य मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील याचे शिफारसी नुसार, कार्यकर्त्याची जाणीव ठेवणारे,तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट* माजी आमदार *आण्णासाहेब प्रा. चंद्रकांतजी सोनवणे* आणि विद्यमान आमदार ताईसाहेब *सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे*यांच्या आदेशान्वये चोपडा तालुका समन्वय पुनर्विलोकन समितिवर लासूर येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास राजाराम यांची अशासकीय सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. 
*चोपडा तालुका समन्वय पुनविलोकन समिति कार्यकारिणी नुकतिच घोषित करण्यात आली असून त्यात शिवाजी संभाजी पाटील ( सनपुले), मच्छिंद्र वासुदेव पाटील ( मोहीदा), ज्ञानेश्वर तुकाराम अहिरे ( हातेड खुर्द), दीपकसींग गणेश जोहरी (अरुणनगर, चोपडा), यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर महिला सदस्य म्हणून सौ. ताराबाई दिलीप पाटील,सौ. शोभाबाई सदाशिव देशमुख व सौ पुप्षा सुनिल जैन* ( बरडिया) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीनचे पदसिद्ध अध्यक्ष आमदार असतात तर पंचायत समिती सभापती व तहसील कार्यालयातील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सदस्य म्हणून नियुक्तीत असतात. पालकमंत्री याच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हा नियुक्ती आदेश काढला आहे उपरोक्त निवडीबद्दल चंद्रशेखर साळुंखेसर संजीवभाऊ शिरसाठ, पं, स. सदस्य भरत बाविस्कर, पत्रकार नंदलाल मराठे, देविदास सोनवणे, गंभीरसर, किशोर माळीसर, कैलास माळी, जितेंद्र कोळी, पत्रकार महेश शिरसाठ, किरणभाऊ देवराज, सुरेश महाजन दीपक चौधरी, राजेंद्र पाटील आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच सेना कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणावर अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने