"वोट द्या, डेअरी मिल्क फ्री मिळवा'' अभिनव उपक्रमाला चोपडा वासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
चोपडा, दि.०४(प्रतिनिधी):- लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि मतदानाचे महत्त्व रुजावे या उदात्त हेतूने येथील आनंद सुपर शॉपने एक आगळावेगळा उपक्रम राबवला. 'वोट द्या आणि डेअरी मिल्क चॉकलेट फ्री मिळवा' या मोहिमेला चोपडा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे सुमारे ५०० हून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा सकारात्मक लाभ घेतला.
आनंद सुपर शॉपने मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली ही कल्पना शहरात चर्चेचा विषय ठरली आणि या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मतदानासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय कर्तव्याशी चॉकलेटचे गोड बक्षीस जोडण्याची ही कल्पना चोपडा नगरपालिका (M.C.) श्री.मनीष कुमार गायकवाड (निवडणूक अधिकारी), श्री. रामनिवास झंवर (सहा निवडणूक अधिकारी( मुख्याधिकारी चोपडा ),श्री. प्रणव पाटील (कर निरीक्षक), श्रीमती.दिपाली साळुंखे (स्वच्छता निरीक्षक), श्री.स्वप्निल धनगर (सिटी कॉर्डिनेटर),श्री. राजेश्वर सूर्यवंशी (संगणक चालक),प्रशासनाने देखील गौरवली आणि त्याची दखल घेतली.
..........................................................................
"लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आम्हाला आनंद आहे की ५०० पेक्षा जास्त लोकांनी यात सक्रिय सहभाग घेतला. आम्ही भविष्यातही समाजासाठी अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण आणि विधायक कार्यांना नेहमीच प्राधान्य देऊ."
आनंद सुपर शॉपचे मालक
..........................................................................
