प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वछता स्टार रँकिंग पारितोषिक

 प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वछता स्टार रँकिंग पारितोषिक 

वसई दि.४(प्रतिनिधी)भाईंदर स्थित एस. एन. एज्युकेशन ट्रस्टच्या प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित स्वछ भारत अभियान अंतर्गत स्वछता स्टार रँकिंग द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम ११,०००/- देऊन गौरविण्यात आले. सदर पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ०४ डिसेंबर २०२५, गुरुवार रोजी माननीय श्री. राधाबिनोद शर्मा (आयुक्त तथा प्रशासक, मि.भा.म.पा), श्री. संभाजी पानपट्टे (सहा.आयुक्त, मि.भा.म.पा), श्री. सचिन बांगर (सहा.आयुक्त, मि.भा.म.पा) यांच्या  हस्ते  भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह,काशिमीरा येथे संपन्न झाला. 

सदर पारितोषिक मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित स्वछ भारत अभियान अंतर्गत मिरा भाईंदर परिसरातील सर्वोत्तम प्रभाग समिती, स्वच्छ  हॉटेल्स, रुग्णालये, सहकारी गृहनिर्माण संस्था, महाविद्यालय व शाळा यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर अभियानाद्वारे नागरिकांना व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करून परिसर स्वछता हि काळाची गरज आहे याचे महत्व, जागरूकता व्हावी या विषयी उद्बोधन व संस्कार करण्याचा मानस आहे. सदर उपक्रम मिरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे किनारपट्टी स्वच्छता, स्वच्छता प्रभातफेरी, निर्माल्य संकलन, ई वेस्ट संकलन व पथनाट्य अशा विविध उपक्रमाद्वारे संपन्न करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिरा भाईंदर महानगपालिकेला देश पातळीवर प्रथम पारितोषिक मिळाले असून असेच यश अधोरेखित करण्याची प्रेरणा माननीय आयुक्तांनी आपल्या भाषणात दिली. वरील उपक्रमांमध्ये प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपला सहभाग व विशेष प्राविण्य मिळविले. त्यासाठीच सर्वोत्तम योगदानासाठी महाविद्यालयाला व्दितीय क्रमांकाचे स्वच्छता स्टार रँकिंग देऊन गौरविण्यात आले.    

सदर पारितोषिकाबाबत संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. रोहिदासजी पाटील,  श्री. महेशजी म्हात्रे (सचिव), सौ. रंजना पाटील (सीईओ), प्राचार्य डॉ. देवीचंद राठोड यांनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. वरील उपक्रम महाविद्यालयामध्ये प्रा. वृक्षाली चौधरी, समन्वयक - ग्रीन क्लब, आणि प्रा. जितेंद्र इंगळे, समन्वयक - राष्ट्रीय सेवा योजना यांच्या द्वारे सौ. रंजना पाटील (सीईओ) यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांच्या उस्फुर्त सहभागाद्वारे संपन्न झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने