स्व. यशवंत गोविंद हरताळकर ऊर्फ स्व. नानासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त चोपडयात ७ डिसेंबरला प्रसिद्ध व्याख्याते श्री. अमृत अभय बंग यांचे व्याख्यान
चोपडा दि.३(प्रतिनिधी)चोपडा शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी तथा माजी मुख्याध्यापक स्व. यशवंत गोविंद हरताळकर ऊर्फ स्व. नानासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता विवेकानंद विद्यालय, यावल रोड, चोपडा येथे श्री. अमृत अभय बंग यांचे 'युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
स्व. नानासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त सन २०१५ ते सन २०२४पर्यंत सतत दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्यातेंचे व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला आहे.त्यात रमा मराठे,अविनाश धर्माधिकारी,डॉ. सुनीलकुमार लवटे,कांचन परुळेकर,अच्युत गोडबोले,दीपक करंजीकर,डॉ. प्रकाश आमटे व डॉ. सौ. मंदाकिनी आमटे ,डॉ. सागर देशपांडे या मान्यवरांचा समावेश आहे.
यंदाचे व्याख्याते अमृत अभय बंग हे संचालक (Program Director) म्हणून हे महाराष्ट्रातील गडचिरोली येथे निर्माण (NIRMAN) या युवा उपक्रमाचे प्रकल्प कार्यरत असलेले एक सामाजिक कार्यकर्ते आणि अभियंता आहेत.त्यांनी आजपर्यंत, २२ हून अधिक राज्यांतील ३५०० हून अधिक तरुणांनी 'निर्माण' प्रक्रियेतून प्रशिक्षण घेतले आहे.यातील ७५० हून अधिक तरुण आज भारतातील १३० हून अधिक सामाजिक संस्थांमध्ये पूर्णवेळ सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत.या तरुणांच्या एकत्रित सामाजिक योगदानाचा कालावधी ३००० पेक्षा जास्त 'व्यक्ती वर्षे' (Person-Years) इतका आहे. थोडक्यात, 'निर्माण' हा प्रकल्प उच्चशिक्षित तरुणांना कॉर्पोरेट जीवन सोडून देशाच्या सामाजिक बदलांमध्ये सक्रिय आणि प्रभावी भूमिका घेण्यासाठी तयार करणारी एक सशक्त चळवळ आहे.त्यांचे मुख्य उद्दिष्ट आरोग्य ,शिक्षण, शेती, पर्यावरण, प्रशासन अशा गंभीर सामाजिक समस्या ओळखण्यासाठी त्यांचे विश्लेषण करण्यासाठी आणि त्यावर कार्यक्षम तोडगे काढण्यासाठी तरुणांना तयार करणे तसेच नुसते ग्राहक न बनता समाजासाठी सक्रिय योगदान देणारे आणि सकारात्मक बदल घडवणारे प्रबुद्ध नागरिक घडवणे हे ध्येय असून" युवा फुलवणे" हा त्याचा मुख्य संकल्प आहे
तरी या व्याख्यानाचा लाभ जनतेने मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन डॉ. विकास हरताळकर, हरताळकर व हॉस्पिटल परिवार , विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र, आणि विवेकानंद विद्यालय, चोपडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
