*"आरती" ची आत्महत्या.. भाजीपाला विक्री करणाऱ्या परिवारावर दु:खाचा डोंगर*...
चाळीसगाव दि. 31 (प्रतिनिधी) शहरातील २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात लोखंडी गजाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
जय बाबाजी चौक येथे घडली मयत आरती आत्महत्या का केली याबाबत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
राकेश उर्फ भैय्या केशव चौधरी (वय- ३० रा. जय बाबाजी चौक ता. चाळीसगाव) येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. मात्र रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घरातील सर्व सदस्यांचे जेवण झाल्याने पत्नी आरती हि एकटीच घरात झोपायला गेली. दुसर्या दिवशी पती राकेश उर्फ भैय्या केशव चौधरी याने घरात जाण्यासाठी दरवाजा ठोकून आवाज दिला असता तिने दरवाजा उघडला नाही. म्हणून शेजारील सुरेश सोनार यांना बोलावून आतून लावलेला दरवाजा हा रॉडने तोडण्यात आले. परंतु घरात शिरकाव करताच पत्नी आरती हिने किचनमध्ये लोखंडी गजाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत पती राकेश उर्फ भैय्या केशव चौधरी यांनी शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास स.पो.नि विशाल टकले हे करीत आहेत.