. *बंजारा समाज तरुणाच्या मृत्यूस जबाबदारांवर..कलम 302 दाखल करण्याची मागणी..तहसिलदारांना बंजारा समाज संघटनेचे निवेदन..*
.
जामनेर दि.31( प्रतिनिधी)
*डोहरी तांडा येथील तरुणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कलम 302 लावण्यात यावे अशी जोरदार मागणी तालुका बंजारा समाज संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. न्याय न मिळाल्यास जामनेर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना बंजारा समाज तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे.*
बंजारा समजाचे समाज बांधव मयत ज्ञानेश्वर प्रताप तंवर हे दिनांक १७/०५/२०२१ रोजी मोटर सायकलने घाणेगाव येथे जात असताना वाकडी येथे अचानक कुत्रा समोर आल्याने मोटार सायकल वरचे नियंत्रण सुटल्याने एका महिलेला गाडीचा धक्का लागला त्याच वेळी त्या महिलेच्या सर्व नातेवाईकांनी व तेथील जमावाने ज्ञानेश्वर प्रताप तंवर यास लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण केली आणि सुमारे एक तास बेशुद्धावस्थेत ज्ञानेश्वर तंवर पडलेले असताना त्यांना डॉक्टर उल्हास पाटील गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता त्यांचा १८/०५/२०२१ रोजी मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून जमावाने केलेल्या मारहाणीने झालाआहे, कायद्याला न जुमानता या जमावाने ज्ञानेश्वर प्रताप तंवर यांस जबर मारहाण केली आहे. असा आरोप करत संबंधित जमावातील लोकांवर तत्काळ ३०२ कलमाद्वारे त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा राज्यभर बंजारा समाजातर्फे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देत जामनेर नायब तहसीलदार श्री प्रशांत निंबोळकर व पोलीस निरीक्षक श्री प्रताप इंगळे याना निवेदन देण्यात आले.
तसेच निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्य ,मा गृहमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य मा पोलीस महानिरीक्षक, नाशिक झोन , मा पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत निवेदन देते वेळी विकास तवर, मुलचंद नाईक ,सुमित चव्हाण , खडकी गावचे सरपंच सुभाष नाईक ,भरत पवार, राजू नाईक ,रमेश नाईक ,डॉ. ऐश्वर्री यश राठोड .महिला प्रदेशाध्यक्ष गोरबंजारा ब्रिगेड महाराष्ट्र. ,प्रियंका सिह ,नितीन नाईक यांच्या सह समाजातील सर्व पक्षीय पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते