मुकुल माधव ट्रस्ट व फिनोलेक्स पाईप यांच्या मार्फत धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे यांच्या माध्यमातून शिंदखेडा व दोंडाईचा रुग्णालयास १० लिटर क्षमतेचे १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन वाटप
शिंदखेडा दि. 31( रविंद्र शिरसाठ)
आज दि.३१ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हा निरीक्षक श्री अर्जुनजी टिळे शिंदखेडा दौऱ्यावर असताना मुकुल माधव ट्रस्ट व फिनोलेक्स पाईप यांच्या मार्फत धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष श्री संदिप दादा बेडसे यांनी निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या हस्ते शिंदखेडा कोविड रुग्णालय व दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयास १० लिटर क्षमतेचे १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व १०० पीपीई किट भेट देण्यात आले.
यापूर्वी देखील दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयास ५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर त्यांनी दिले होते.
यावेळी प्रांताधिकारी विक्रमजी बांदल, शिंदखेडा तहसीलदार सुनील जी सैंदाणे, दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भूषण मोरे, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर भूषण काटे, डॉक्टर जितेंद्र देशमुख तसेच नाना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण नाना शिंदे, धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, प्रदेश सचिव सुरेशजी सोनवणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई पावरा,जि.प. सदस्य पोपटराव सोनवणे, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष सुरेश महाजन, युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे, दोंडाईचा शहराध्यक्ष ऍड एकनाथ भावसार, शिंदखेडा शहराध्यक्ष श्री प्रवीण पाटील, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, शिंदखेडा विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील, युवक शिंदखेडा शहराध्यक्ष गोलू देसले, कार्याध्यक्ष कमलाकर बागले, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर, दीपक जगताप,रहीम मंसूरी, दादाभाई कापुरे, चेतन देसले, मधुकर तावडे, छत्रपाल पारधी, योगेश पाटील, भुषण माळी, ऋषिकेश मराठे, छोटू भाई शाह, डॉक्टर शांताराम पाटील, राजेंद्र सोनवणे, शेवाळे उपसरपंच छोटू फौजी,दर्पण पवार, प.स. सदस्य भगवान भिल, महेंद्र सिसोदे, संदीप सिसोदे, कपील पाटील, बेटावद उपसरपंच संदीप थोरात,आदि उपस्थित होते