*
*चाळीसगाव दि. 31(प्रतिनिधी) : तालुक्यातील वलठान येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दूदैवी घटना घडलीअसून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मयताचे नाव प्रभू पवार असल्याने समजते. याबाबत ग्रामीण पोलीसातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.*
प्राप्त वृत्त असे, तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी प्रभु विठ्ठल पवार (वय-४५) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. काल तिसऱ्याप्रहरीच्या सुमारास तालुक्यातील वलठान शिवारातील धरणात पोहण्यासाठी गेले. पोहोतांना अचानक पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार नातेवाईक कृष्णा सुदाम तडवी रा. शामवाडी ता. चाळीसगाव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरील "प्रभू" यास ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरी वरून ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोनि संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.काॅ.महेंद्र साळुंखे हे करीत आहेत.