*केंद्राने स्थापन केलेल्या 'जीएसटी परिषद ' समितीत*
*महाराष्ट्रातून ना. अजित पवारांकडे यांची वर्णी : आठ राज्यातील* *मुख्यमंत्र्यांचा समावेश*
*नवी दिल्ली दि, 30* : केंद्रिय वित्त मंत्रालयाने जीएसटी परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्री अथवा वित्त मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे.
या समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.*
*या समितीचे काम काय?*
कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक वस्तूंवर 'जीएसटी'त माफी, सवलत देण्याची आग्रही मागणी अजित पवारांनी केली होते.
या मागणीची तात्काळ दखल घेत याबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रिय वित्त मंत्रालयाने परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या समिती स्थापन केली.
ही समिती आता जीएसटी माफी सवलती देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन 8 जून रोजी आपला शिफारस अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर या वस्तूंवर सवलत मिळावी कि नाही याविषयी केंद्रीय वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेणार आहे.
या समितीत संयोजक म्हणून मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा असून सदस्य म्हणून गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे मंत्री मौविन गोडीन्हो आदी 8 नेत्यांचा समावेश आहे.