*सिटी स्कोर 25 वयोवृद्ध जिजाबाईंची कोरोनावर यशस्वीरित्या मात सिद्धिविनायक मल्टिपेशालिस्ट हाॅस्पीटल ठरवले जीवदान*
*पाचोरा दि.30( प्रा. शांताराम चौधरी* ) सिटी स्कोर 25, वय 68 तरी जिजाबाईंची कोरोनावर यशस्वी रित्या मात. *सिद्धिविनायक मल्टिपेशालिस्ट हाॅस्पीटल ठरवले जीवदान*
वय 68 वर्ष, सीटी स्कोर 25, ऑक्सिजन लेवल 70 तरीही जिजाबाई ठणठणीत होऊन सुखरूप घरी परतल्या
पाचोरा येथील शंभू नगरातील रहिवासी *68 वर्षीय जिजाबाई सर्जेराव गायकवाड* यांचा सिटी स्कोर *25 ,ऑक्सीजन लेव्हल 70 आणि* *100% कोवीड निमोनियाने बाधीत होत्या.*
*सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* मध्ये 20 दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत होऊन सुखरुप घरी परतल्या आहेत. गायकवाड कुटुंबीयांनी *सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांचे केलेले कौतुक प्रेरणादायी मानले जात आहे.*
शंभू नगरातील *जिजाबाई गायकवाड यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात व नंतर गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु प्रकृती सुधारत नसल्याने त्यांचे पोलीस कर्मचारी असलेले पुत्र रवींद्र गायकवाड यांनी त्यांना पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* मध्ये उपचारार्थ दाखल केले. यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक चिंताजनक होती.त्यांचा सिटी *स्कोर 25, ऑक्सीजन लेव्हल 70 व 100% कोवीड निमोनियाने ग्रस्त. अशा अवस्थेत सिध्दीविनायक मल्टिपेशालिस्ट चे संचालक*
*डॉ. स्वप्नील पाटील* यांनी गायकवाड कुटुंबियांना दिलासा देत जिजाबाईंवर शर्थीचे उपचार केले. व 20 दिवसांच्या उपचारानंतर जिजाबाईं ची तब्बेतीत सुधारणा होऊन सुखरुप घरी परतल्या आहेत. त्यांचे सुखरूप घरी परतणे त्यांना मिळालेले नवीन जीवन मानले जात असून त्यांचा *डॉ. स्वप्नील पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला* तर गायकवाड कुटुंबीयांनी *डॉ. स्वप्नील पाटील* *यांचे मनापासून कौतुक करत आभार मानले.*
*पाचोरा येथील सिद्धिविनायक* *मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे* *संचालक डाॅ. स्वप्नील प्रल्हादराव पाटील यांचा सत्कार करताना जिजाबाई गायकवाड व त्यांचे कुटुंबीय.*”