*माजी आमदार दिलीप वाघ यांनी पाचोरा कृषी उत्पन्न* *बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला* : *अॅड. अभय पाटीलांसह अन्य सदस्यांचा समावेश*
*पाचोरा दि. 30 (प्रा. शांताराम चौधरी )* येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदाचा कार्यभार माजी आमदार दिलीप वाघ यांनी स्वीकारला असून अन्य प्रशासक म्हणून एडवोकेट अभय पाटील चंद्रकांत धनवडे प्राध्यापक शिवाजी पाटील रणजीत पाटील पत्रकार अनिल महाजन यांनी प्रशासक पदाचा कार्यभाग स्वीकारला आहे
यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ राष्ट्रवादीचे पाचोरा तालुका अध्यक्ष नगरसेवक विकास पाटील सतीश चौधरी नगरसेवक वासुदेव महाजन अशोक मोरे एडवोकेट अविनाश सुतार अझर खान निलेश जकातदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष विजय पाटील ज्येष्ठ नेते दगाजी वाघ विजय जकातदार महा विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बीबी बोरुडे यांनी मुख्य प्रशासक माजी आमदार दिलीप वाघ व अन्य प्रशासक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व्यापारी असोसिएशन अडत असोशियन मार्केट कमिटी कर्मचार्यां तर्फे सचिवां तर्फे मुख्य प्रशासक दिलीप वाघ व अन्य प्रशासकांचा उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे इस्माईल भय्या, माजी संचालक दत्तात्रय पाटील, सोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यात प्रकाश निकुंभ, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन दादा तावडे, शिंदाडचे माजी सरपंच सदाशिवदादा पाटील, शेतकी संघ चेअरमन सुनील विठ्ठल पाटील, माजी चेअरमन शिवाजी दादा भोसले, माजी सभापती इस्माईल शेठ, माजी नगराध्यक्ष श्याम भोसले, माजी नगरसेवक नानासाहेब देवरे, विनय बाबा जकातदार,तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, माजी शहरप्रमुख भोला आप्पा पाटील, शहरप्रमुख अझहर खान, शेतकी संघ व्हॉइस चेअरमन रामधन परदेशी, संचालक दिनेश पाटील, हारून दादा देशमुख, संजय पाटील, प्रकाश एकनाथ पाटील, ए बी अहिरे सर, अविनाश सुतार वकील, सुदर्शन सोनवणे, प्रदीप वाघ,सुनील पाटील सर, विक्रांत सर, सर्व व्यापारी, हमाल मापाडी सर्व संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.