जळगाव दि.29 : मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशा नंतर पुन्हा एकदा भाजपला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव महापालिकेतील एकूण तीन भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुरेश सोनवणे, सौ शोभा बारी, शेख हसिना शेख शरीफ या भाजपाच्या तिन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेना सचिव विनायकजी राऊत, संपर्क प्रमुख विलासजी पारकर, संजय सावंत, मोहन म्हसळकर, उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या उपस्थित शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.
जळगाव भाजपला खिंडार : 3 नगरसेवक शिवसेनेत "वर्षा" बंगल्यावर बांधले शिवबंधन
Zatpat Polkhol News
0
Zatpat Polkhol News
खानदेशातील वाचकाचे चाहते वृत्तपत्र *"दैनिक जनशक्ती*" या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून 15 वर्षाच्या कारकीर्दीत समाज हिताचे लिखाण करून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. वृत्तपत्र क्षेत्रात जाहिरात, बातम्या सर्वच विभागात कामाची हातोटी असल्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे राजकीय. सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय देऊन निस्वार्थी, निगर्वीपणे पुढे आलो आहे. शिवाय साप्ताहिक चौखंबा वृत्तपत्राचे उपसंपादक म्हणून काम केले आहे. "दिवाळी विशेषांक" खास शैलीत काढले आहेत. महाराष्ट्र 99 न्यूज चॅनेलचे उपसंपादक म्हणून कामगिरी बजावली आहे. आदिवासी, दिव्यांग दीन-दलित व वंचित समाज गोर गरिबांची सेवा अविरतपणे बजावित आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्यासाठी तत्पर आहे. भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी *"झटपट पोलखोल न्यूज"* लेखणी सुरूवात केली आहे.
भविष्यात सर्व सामान्य गोर गरिब व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान देणार असून अन्याय व भ्रष्टाचार विरोधी धारदार लेखनीने आवाज उठवून न्याय देण्यासाठी झिजणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थी, लोकांपर्यंत पोहोचून शासन योजना पोहचविण्याची मोलाची जबाबदारी पार पाडून जन जागृती अभियान राबविणार आहोत