*मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; बाॅम्बशोधक पथकाकडून तपास सुरू..!!*
मुंबई दि. 30 :
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आलीय. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं असून कथित बाॅम्बचा तपास सुरु आहे.
मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील हॉटलाईनवर आज दुपारी हा फोन आला. फोनवरून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
साधारणतः तासाभरापूर्वी एक निनावी फोन आला होता. त्या फोनवर मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले आहे. या अज्ञात कॉलमुळे मंत्रालयाबाहेरील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
याची फोनकॉलची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली असून त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
त्यानंतर आजूबाजूच्या मंत्रालयातील मुख्य आणि इतर ठिकाणी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. तर श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान, मंत्रालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असूनही हा बॉम्ब मंत्रालयात कोणी व कसा नेला यांची माहिती अद्याप मिळू शकली नाही.