वेले आखातवाडे अर्धे गाव अंधारात : गरीब वस्तीत संतापाची लाट.. वीज वितरण कंपनीचा कानाडोळा तीन दिवसापासून दोन तार जुडता.. जुडेनात


*वेले आखातवाडे अर्धे गाव अंधारात : गरीब वस्तीत संतापाची लाट.. वीज* *वितरण कंपनीचा कानाडोळा*  
 *तीन दिवसापासून दोन तार जुडता.. जुडेनात*
 
चोपडा दि. 30 (दीपक गवळी) तालुक्यातील वेले आखातवाडे येथे गेल्या तीन दिवसांपासून अर्ध्या गावात वीज पुरवठा खंडित असल्याने गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत असून फक्त मागासवर्गीय दीन दलित गोर गरिबांचा वस्तीतच वीज नसल्याने विद्युत वितरण कंपनी कंपनी पक्षपात करीत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावात शिवराम नगर, धनगरवाडा चौधरी वाडा अशा अर्ध्या गावात वीज पुरवठा सुरळीत आहे. मात्र दलीत वस्ती, कोळी, भील्ल, आदिवासी लोक राहतात त्या भागात गेल्या तीन दिवसांपासून वीज बत्ती गुल असल्याने पिण्याचे पाणी, दळण आदि समस्या निर्माण झाल्या आहेत सरपंच, उपसरपंच आदिंसह रहिवाशांनी तक्रार करूनही अवघे दोन तार जोडणी करायला तीन दिवस उलटूनही काहीही कार्यवाही होत नसल्याने जनतेत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. तरी संबंधित विभागाच्या वीज पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने