रावेर दि. 28 (प्रतिनिधी) : अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. सदर भागात वाघाळी,निंबोल, सुलवाडी,निंभोरासीम,धामोडी अहिरवाडी या गावांमध्ये शेती व घरांची पाऊस व जोरदार वादळामुळे झालेल्या नुकसानीची खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व रहिवास्यांचे सांत्वन केले.
तसेच झालेल्या नुकसानीचे तहसीलदार रावेर यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार रक्षा ताई खडसे यांनी दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, माजी जि. प. उपाध्यक्ष नंदू महाजन, म.स.का.उपाध्यक्ष भागवत पाटील, माजी प.स.सभापती जितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजयुमो रावेर तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, भाजयुमो मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, प्रल्हाद पाटील, सरपंच भास्कर पाटील, चंदन पाटील, चंद्रकांत विचवे, यांच्यासह रावेर तहसिलदार देवगुने, सहाय्यक गट विकास अधिकारी डी.एच.पाटील, कृषि अधिकारी भामरे, मंडळ अधिकारी मीना तडवी, तलाठी भाग्यश्री परवे, तलाठी किर्ती कदम, तलाठी शिरसाठ इ. उपस्थित होते.