चोपडा दि. 28 (प्रतिनिधी) : तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊसधारा बरसल्याने अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झालेअसून ऐन तोंडावर आंबा झाडांचे कैरी झडून पडल्याने नुकसान झाले आहे तर केळी जमीनीवर लोळून पडली असून अनेक घरांचे छोटे मोठे नुकसान झाल्याने तालुकावासियांच्या चिंतेतभर पडली आहे. गटविकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देऊन शासकीय अधिकारी घटनास्थळी घेऊन जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले त्यानुसार गटविकास अधिकारी कासोदे, ग्रामसेवक विसावे, वेले उपसरपंच दीपक पाटील, सरपंच व पोलीस पाटील समक्ष वेले नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.