आ. चंद्रकांत पाटील यांची झटपट सेवा पाहून जनता भारावली मुक्ताईनगर तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा प्रचंड नुकसान केळीबागां उध्वस्त : 180 घरांची पत्रे उडाली

  मुक्ताईनगर दि. 28(किरण जाधव)काल तालुक्यात चक्रीवादळाच्या तडाख्याने केळीबागांसह प्रचंड नुकसान झाले असून मुंढोडदे गावात 180 चेवर घरांचे पत्री शेड उडालेने प्रचंड नुकसान झाले आहे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देऊन शासकीय अधिकारी घटनास्थळी घेऊन जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शिवाय स्व: पदरी मोड. करत 15 मजूर लाऊन नुकसानग्रस्त घरांचे काम करुन घेत असल्याने आमदार खरे लोकसेवक ठरून सध्या गरिबांचा दाता ठरले आहेत.* 
तिसर्‍या प्रहरीच्यासुमारास पूर्णा व तापी नदी किनारा लगतच्या उचंदे गणातील पुरणाड, उचंदे , शेमळदे, पंचाणे, मुंढोदे , मुंढोळदे, नायगाव , पिंप्रीनांदू , बेलसवाडी, कर्की, पिंप्री पंचम अचानक उद्धवलेल्या चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला असून हजारो हेक्टर वरील केळी बागा उद्वस्थ झाल्या तसेच अनेक घरांची , गुरांच्या गोठ्याची पडझड झाली .विजेचे पोल , व तारा तुटल्याने परिसर भग्न व अंधकारमय झाला.

 या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज दि 28 मे 2021 रोजी सकाळी 8 वाजेपासून आमदार चंद्रकांत पाटील , तहसिलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी संतोष नागतिळक, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी , ग्रामसेवक व कृषी सहायक अशा शासकीय फौजफाट्यासह पाहणी केली. यावेळी सरसकट पंचनामे करून तात्काळ अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी संबंधितांना दिल्या. 

तसेच मुंढोळदे या गावातील सुमारे 180 च्या वर घरांची पत्रे वादळात उडून गेली आणि मुसळधार पावसात भिजून सर्व डाळ, दाणा व अन्नाची नासाडी झाल्याने काल रात्री पासून उपाशी पोटी असलेल्या गावकऱ्यांसाठी स्वखर्चातून सकाळ , संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली.सदरील जबाबदारी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले हे पार पाडीत आहेत. तसेच गावातील उद्वस्थ घरे तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा उभी करण्यासाठी आमदारांनी पदरमोड करून 15 मजुरांची टीम सहकार्यासाठी तात्काळ उपलब्ध केली.
 
    यावेळी आमदारांसह काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई , दिलीप पाटील , राजेंद्र तळेले, स्वीय सहायक प्रशांत पाटील व इतर पदाधिकारी शेतकरी तसेच गावकरी उपस्थित होते.

 वादळी वारा व पावसामुळे खूप नुकसान झाले त्याची प्रत्यक्ष पाहणी केली व अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या व शासनाकडून तात्काळ मदत मिळावी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व मुख्य सचिव यांचेशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने