रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा"
चोपडा दि.१७(प्रतिनिधी)दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि नगरपरिषद चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा" नाट्यगृह, चोपडा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन स्तरावरील "वंदे मातरम" या गटामध्ये भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले. या स्पर्धेत भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाला "द्वितीय क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेमध्ये मोहिनी पाटील, दिव्या कोळी, शिवानी सोनगिरे, अनिता पावरा, रोशनी पावरा, दिव्या धनगर आणि नफिसा तडवी या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
या सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर सर आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी सर, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेकरिता देवयानी माळी मॅडम, भावेश लोहार सर, प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
