महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष तथा आमदार सौ. चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली चोपड्यात संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न

 महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष तथा आमदार  सौ. चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली चोपड्यात  संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न 

चोपडा, दि. १७(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (जळगाव पूर्व) च्या वतीने चोपडा येथील लक्ष्मीनारायण लॉन्स अँड रेसिडेंसी येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान जळगाव जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष तथा चोपडा भाजप नगरसेवक संध्याताई महाजन यांनी भूषविले. कार्यक्रम जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, नरेश महाजन (महाराष्ट्र-गुजरात-मध्य प्रदेश माळी समाज सदस्य), मंडळ अध्यक्ष कांतीलाल पाटील सर, नरेंद्र पाटील आणि पिंटू भाऊ पावरा व सर्व बीजेपी पदाधिकारी  यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या संपन्न झाला.

बैठकीस महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सौ. चित्राताई वाघ, प्रदेश प्रभारी सौ. सविताताई जैसवाल, धुळे महापौर तथा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा आणि प्रदेश महामंत्री महिला मोर्चा सौ. जयश्री कमलाकर अहिरराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

बैठकीत जळगाव पूर्व विभागातील महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. बूथ स्तरापासून ते प्रभाग स्तरापर्यंतच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली. संघटन बांधणी, महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार आणि आगामी काळातील कार्यक्रमांबाबत सखोल विचारमंथन झाले.

सौ. चित्राताई वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला मोर्चाला अधिक गतिमान आणि प्रभावी बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महिला केंद्रित योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला.

सौ. जयश्री कमलाकर अहिरराव यांनी संघटनात्मक बळकटीसाठी स्थानिक पातळीवर सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली, तर रेखाताई वर्मा यांनी महिला मोर्चाच्या कार्यात अधिक गती आणण्याबाबत मार्गदर्शन केले.जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष संध्याताई महाजन यांनीही सर्वांनी एकत्रितपणे काम करून महिला शक्तीला पुढे नेण्याचे आवाहन केले.बैठकीस महिला मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होत्या. ही बैठक संघटनात्मक बळकटी आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने