स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी वातावरण भारावले
चोपडा दि.१७( वार्ताहर )चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी संस्थेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण शाळेचा परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना वैभवी पाटील, चैतन्य पाटील,आदित्य जैन या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी देशाप्रती आपले कर्तव्य, जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम यांचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी, समूहगीतांनी, नृत्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.चेतना बडगुजर व शीबा टीचर केले. तसेच देशभक्तीपर गीत सादर करण्यासाठी श्री.राजपूत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करताना विविधतेतून एकता याचे दर्शन घडवून आणले,विद्यार्थ्यांना भावना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, शिस्त, बंधुभाव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक रजिश सर , निखिला मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्वातंत्र्य दिन सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. ‘देश प्रेम ’ या भावनेने प्रेरित होऊन राष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. याप्रसंगीसंस्थेच्या अध्यक्षा मा.सौ. शैलाबेन मयुर, चेअरमन मा. राजाभाई मयूर उपाध्यक्ष- मा. विश्वनाथभाई अग्रवाल, सचिव - मा.माधुरी ताई मयुर,पीपल्स को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन तथा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मा. चंद्रहासभाई गुजराथी, मा.भूपेंद्रभाई गुजराथी मा.रमेशकाका जैन मा.किरणभाई गुजराथी, प्रा.आर.बी गुजराथी सर, मा. प्रवीण भाई गुजराथी मा. किरण भाई गुजराथी, मा. योगी भाई मयुर प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक रजिश बलन, उपमुख्याध्यापक निखिला रजीष संस्थेचे समन्वयक मा.गोविंदभाई गुजराथी सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
