का.स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ सर्वसाधारण सभा संपन्न
जळगाव, दि. १६(प्रतिनिधी) : का.स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व जिल्हा परिषद मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. सभेत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात येऊन त्यासाठी प्रभावी लढा उभारण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे केंद्रीय सहसचिव आर. एस. अडकमोल होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती इंदिराताई जाधव व श्रीमती के. यू. शेख उपस्थित होत्या. व यावेळी जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर, महेंद्र वानखेडे, जगन्नाथ नन्नवरे, मोहन टेमकर, श्रीमती विजया पाटील, सुनील निकम, सुनील शिंदे, मिलिंद लोणारी, प्रकाश कोळी व योगेश लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संघटनेच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. श्री महेंद्र वानखेडे यांची विभागीय अध्यक्ष, श्री संजय धोंडू बाविस्कर यांची जिल्हा उपाध्यक्ष, श्रीमती इंदिराताई जाधव यांची ज्येष्ठ सल्लागार तसेच श्रीमती सुनिता श्यामराव चौधरी यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
तालुकानिहाय अध्यक्ष व सचिव म्हणून पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली – अमळनेर : अध्यक्ष श्री शैलेंद्र हिलाल थोरात; भडगाव : अध्यक्ष श्रीमती नीलिमा माळी, सचिव श्रीमती आशा पाटील; भुसावळ : अध्यक्ष श्री रविंद्र सोनवणे, सचिव श्री नितीन चापोरकर; बोदवड : अध्यक्ष श्री योगराज लोहार; चाळीसगाव : अध्यक्ष श्रीमती सविता राठोड; चोपडा : अध्यक्ष श्री नितीन चव्हाण, सचिव श्री प्रकाश पारधी; धरणगाव : अध्यक्ष श्री अतुल नन्नवरे, सचिव श्री अनिल महाजन; एरंडोल : अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण, सचिव श्रीमती मनीषा सोनवणे; जळगाव : अध्यक्ष श्री संजय राजपूत, सचिव श्री प्रशांत चौधरी; जामनेर : अध्यक्ष श्री पुंडलिक पवार, सचिव श्रीमती प्रतिभा घुगे; मुक्ताईनगर : अध्यक्ष श्रीमती रंजना मेश्राम, सचिव श्रीमती रिटा सोनवणे; पारोळा : अध्यक्ष श्री केशव ठाकूर; पाचोरा : अध्यक्ष श्री माधवराव मगर; रावेर : अध्यक्ष श्री मेहमूद तडवी; यावल : अध्यक्ष श्री दीपक दीक्षित, सचिव श्री अब्दुल रजाक मण्यार.
