ॲग्रीस्टॅक' शेतकरी पोर्टलवरील 'वनवासी' शब्दाला बिरसा ब्रिगेडचा विरोध.. प्रकल्प कार्यालयाने घेतली दखल

 

' ॲग्रीस्टॅक' शेतकरी पोर्टलवरील 'वनवासी' शब्दाला बिरसा ब्रिगेडचा विरोध.. प्रकल्प कार्यालयाने घेतली दखल



चोपडा दि.१६(प्रतिनिधी):केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) शेतकरी नोंदणी डिजिटल प्रणालीमध्ये वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांचा उल्लेख 'वनवासी' असा येत असल्याबाबत 'बिरसा ब्रिगेड सातपुडा, जिल्हा जळगाव' संघटनेने तीव्र आक्षेप घेत  निवेदनाद्वारे लक्ष वेधले असता प्रकल्प कार्यालयाने दखल घेत जिल्हा कृषी विभागाकडे तसे पत्र पाठविले आहे.
भारतीय संविधानानुसार शासकीय दस्तऐवजात 'आदिवासी' किंवा 'अनुसूचित जमाती' (ST) असा स्पष्ट उल्लेख असताना, डिजिटल प्रणालीत मात्र 'वनवासी' असा चुकीचा शब्दप्रयोग वापरण्यात आल्याने संपूर्ण समाज बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या संदर्भात  बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री. रामदास भाईदास पावरा यांच्या नेतृत्वाखाली  प्रकल्प अधिकारी यांना ई-मेल आणि लेखी निवेदनाद्वारे या गंभीर तांत्रिक त्रुटीकडे लक्ष वेधण्यात आले होते.
त्यावर प्रकल्प अधिकारी   तात्काळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांना अधिकृत पत्र  पाठवून सदर पोर्टलवर 'वनवासी' शब्दाऐवजी 'आदिवासी' किंवा 'अनुसूचित जमाती' असा स्पष्ट उल्लेख करण्याचे आदेश दिले.
ही मागणी बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रामदास भाईदास पावरा, उपाध्यक्ष उखा बारेला, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते  प्रमोद बारेला ,  मुकेश पावरा यांच्यासह जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने