जळगाव ते पंढरपूर ४८५ किलोमीटर सायकल वारी पूर्ण; कर अधिकारी श्री. संदीप गायकवाड यांचा सत्कार

 जळगाव ते पंढरपूर ४८५ किलोमीटर सायकल वारी पूर्ण; कर अधिकारी श्री. संदीप गायकवाड यांचा सत्कार

चोपडा,दि.२८(प्रतिनिधी) : चोपडा नगरपरिषदेचे कर अधिकारी श्री. संदीप गायकवाड यांनी जळगाव ते पंढरपूर हा सुमारे ४८५ किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करून विठ्ठल भक्ती, शारीरिक तंदुरुस्ती आणि जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी  नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील, उपनगराध्यक्ष श्री. भैय्यासाहेब पंकज बोलले तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन दादा पाटील यांच्या हस्ते श्री. संदीप गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. गायकवाड यांच्या जिद्द, चिकाटी व साहसी वृत्तीचे कौतुक केले. जळगाव ते पंढरपूर हा ४८५ किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करणे ही मोठी आणि प्रेरणादायी कामगिरी असून युवकांनीही आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि शिस्तीचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार, नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. संदीप गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपमुख्य अधिकारी संजय मिसर, दिगंबर वाघ नगर अभियंता, जितेंद्र मोरे पाणीपुरवठा अभियंता, प्रमोद पाटील विद्युत अभियंता, मयूर शर्मा लेखापाल, चेतन गडकर लेखा परीक्षक, प्रणव पाटील कर निरीक्षक, वसंत राठोड स्वच्छता निरीक्षक, दिपाली साळुंखे, जयेश भोंगे स्वच्छता निरीक्षक, महेश जोशी भांडारपाल उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने