विठू नामाच्या गजरात दुमदुमली प्रताप विद्या नगरी...!
चोपडा दि.२६(प्रतिनिधी)चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराने आयोजित केलेला वृक्षदिंडी व ज्ञानदिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुख्य आकर्षण कलशधारी व ग्रंथशीरी घेतलेल्या मुली तसेच विद्या मंदिराच्या संगीत कला दालनातील सुमधुर आवाजात विठू नामाचा गजर करणारे मुले, दिंडी सोहळ्याची सुरुवात प्रताप विद्या मंदिराच्या गावातील विभागातून करण्यात आली. प्रारंभी सुंदर वारकरी संप्रदायातील पोशाख घेतलेली मुले ,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई संत एकनाथ अशा विविध संत महात्म्यांचे सजीव देखावे सादर करणारी मुलांनी शहरातील नागरिकांना देखील रस्त्यावर मनसोक्त विठुरायाचे स्मरण करण्यास उत्साहीत केले. या पालखी सोहळ्यात संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य श्री .भूपेंद्रभाई गुजराथी, श्री .प्रवीण भाई गुजराथी संस्था समन्वयक श्री गोविंद भाई गुजराथी ,माजी मुख्याध्यापक श्री डी व्ही याज्ञिक यांनी टाळ- मृदुंगांच्या साथीने अतिशय सुंदर भजने सादर केलीत. या पालखी सोहळ्याची सांगता शहरातील प्रताप विद्या मंदिराच्या मुख्य प्रांगणात भव्य रिंगण सोहळ्याने करण्यात आली. या सोहळ्यात विद्यार्थी, पालक व शिक्षक सहभागी झालेत. सर्वांनी सामूहिक फुगडी सादर केली.
यावर्षी आषाढी निमित्ताने वेगवेगळ्या सामाजिक व शैक्षणिक विषयांवर शहरातील राणी लक्ष्मीबाई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंकज नगर या भागात विद्यार्थ्यांनी *वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धन, लोकसंख्या वाढ, आमची जनगणना आमचे भविष्य* या विषयावर शिक्षकांच्या सहकार्याने पथनाट्य सादर केलीत. विद्या मंदिर दरवर्षी आषाढी निमित्ताने सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विद्या मंदिराच्या प्रांगणात वृक्ष लागवड करत असते. म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे श्रीम. सविता सोनवणे .श्री आर. ए. पाटील, श्रीमती पगार मॅडम ,श्रीमती मोरे मॅडम, श्रीम कविता पाटील श्री गुणवंत भाऊ व श्री भिल्लदारा तसेचविद्यालयातील हरित सेना प्रमुख श्री गिरीश महाजन उपस्थित होते. सांगता समारोह नंतर सर्व विद्यार्थी ,पालक शिक्षक बंधू-भगिनींसाठी फराळाचे वाटप करण्यात आले.या सर्व दिंडी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन प्रशाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी पाटील मॅडम उपमुख्याध्यापक श्री ए एन भट तसेच पर्यवेक्षक श्री करमरकर, श्री नागपुरे ,उप प्राचार्य श्री शेलार यांनी केले. सर्व विभागातील शिक्षक बंधू - भगिनी लेखनिक- कर्मचारी बंधू उपस्थित होते.
