भाजपा च्या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांचे रक्तदान
गणपूर(ता चोपडा)ता 25: (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका ग्रामिण पूर्व व पश्चिम मंडलाकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकमधील हाॅटेल गुरुदत्त येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबिर यशस्वीतेसाठी चोपडा तालुका पश्चिम मंडलाचे अध्यक्ष कांतिलाल पाटील, पूर्व मंडल अध्यक्ष पिंटु पावरा, राकेश पाटील, चंद्रशेखर पाटील,रविंद्र पाटील, हनुमंतराव महाजन,दिलीप पाटील, भरत जाधव, अतुल ठाकरे, पंकज पाटील व पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
स्व. मुकेशभाई पटेल रक्तपेढीच्या आरोग्य पथकाने रक्तदात्यांची आरोग्य तपासनी करुन रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले......
