मध्य प्रदेशातील पार उमरटी येथे अंतरराज्यीय 'ऑपरेशन कॉम्बिंग कारवाईत बेकायदेशीर शस्त्रे, दारूगोळा व ३२ वाहनांसह शस्त्रसाठा जप्त.. जळगाव ,नाशिक, धुळे,वरला पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ४००पोलिसाच्या ताफ्याने केली कारवाई
चोपडा दि.२१(प्रतिनिधी)मध्य प्रदेशातील पार उमर्टी येथे नाशिक धुळे व जळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी प्रथमच अवैध करीत्या पिस्तोल तयार करणाऱ्यांचे अड्डे उध्वस्त करून आरोपींना पकडण्यासाठी जोरदार मिशन राबविण्यात आले असून 20 जणांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यात दोन देशी कट्टे व चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.यात जवळपास 32 निनावी मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.या मिशन मध्ये पोलीस अधिकारी दर्जाचे जवळपास 43 अधिकारी तर 400 हून अधिक पोलिस व 20 शासकीय वाहनांचा ताफा भरधाव वेगात घुसल्याने गावात अचानक पळापळ सुरू होऊन गावभर चांगलाच सन्नाटा पसरला.
जळगाव जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेणे, अवैध शस्त्रास्त्रांच्या निर्मिती व तस्करीवर समूळ उच्चाटन करणे या उद्देशाने हीमोहीम आखलेली होती.पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या थेट नेतृत्वाखाली जळगाव, नाशिक आणि धुळे पोलीस दलाने मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे पहाटेच्या सुमारास धडक 'ऑपरेशन कॉम्बिंग search' मोहीम राबवून कारवाई केली आहे.सदर कारवाई गंभीर गुन्ह्यांतील संशयित व फरार आरोपींच्या शोधाकामी ही आयोजित करण्यात आली होती:
यात चोपडा शहर पो.स्टे. गु.र.नं. १०३/२०१६:** भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४) सह शस्त्र अधिनियम कलम ३/२५.चोपडा ग्रामीण पो.स्टे. गु.र.नं. २२/२०२५:** शस्त्र अधिनियम कलम ३/२५.पवारवाडी पो.स्टे. (मालेगाव, जि. नाशिक) गु.र.नं. १७५/२०२६:** शस्त्र अधिनियम कलम ३, ७, २५ या गुन्ह्याचा तपासणीचा हा भाग होता.
कारवाईचा तपशील व पोलीस ताफा
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते (चाळीसगाव),सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सिद्धार्थ बारवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे (जळगाव विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते (अमळनेर विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले (भुसावळ विभाग).उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील, चोपडा उपविभाग,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील, शिरपूर उपविभाग,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखा धुळे,पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड,स्थानिक गुन्हे शाखा जळगाव,पोलीस निरीक्षक राहुल खताळ पवारवाडी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण, पोलीस निरीक्षक पवन देसले चोपडा शहर ,पोलीस निरीक्षक संजय सोनवणे चोपडा ग्रामीण ,पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, रामानंद नगर,पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, नियंत्रण कक्ष धुळे यांनी ही धडक कारवाई केली.
पोलीस बळ : जळगाव जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षक, 35 दुय्यम पोलीस अधिकारी व २४० पोलीस अंमलदार; नाशिक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व ७० अंमलदार; धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व ७० अंमलदार (एकूण ४०० हून अधिक पोलीस ताफा व २० शासकीय वाहने).
पहाटेच धडकले पथक
पथक मध्यरात्री ०१:०० वाजता रवाना होऊन पहाटे ०४:०० ते सकाळी ०८:०० या वेळेत पार उमरटी येथे तीव्र शोध मोहीम राबवण्यात आली.
शोध मोहिमेदरम्यान पथकाने खालीलप्रमाणे ठोस कारवाई केली:
घरांची तपासणी व चौकशी:
४५ संशयित घरांची झडती घेण्यात आली असून २० जणांकडे सखोल चौकशी करण्यात आली.
आरोपी ताब्यात:12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शस्त्रे व दारूगोळा जप्त: चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून २ देशी कट्टे व 4 जिवंत राउंड** हस्तगत करण्यात आले.
मुद्देमाल जप्ती:
३२ निनावी आणि महाराष्ट्र पासिंग (MH Passing) संशयित मोटारसायकल.
मोठ्या प्रमाणात देशी कट्टे बनवण्याचा कच्चा माल आणि साचे.
जिओ-टॅगिंग (Geo-Tagging): फरार व संशयित २७ आरोपींच्या घरांचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे Geo-tagging करण्यात आले आहे.
