चोपडा काँग्रेस च्या शहराध्यक्ष पदी अशोक साळुंखे यांची तर तालुकाध्यक्ष पदी मोहन पाटील यांची निवड
चोपडा,दि.२१(प्रतिनिधी): काँग्रेस पक्षाच्या तालुकास्तरीय संघटनात्मक रचनेत मोठा खांदेपालट करण्यात आला असून, चोपडा शहराध्यक्षपदी देशमुख नगर येथील अशोक माणिकराव साळुंखे तर तालुकाध्यक्षपदी तावसे खुर्द येथील मोहन देवराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे व शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पक्षाच्या धोरणानुसार ही नवीन निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित शहराध्यक्ष अशोक साळुंखे व तालुकाध्यक्ष मोहन पाटील यांचा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील आणि जिल्हा उपाध्यक्षा डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, नगरसेविका वंदना पाटील, अमोल पाटील, माजी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, रमाकांत सोनवणे,देवा पारधी,अशोक सोनवणे,मुन्ना साळुंखे,किरण पाटील यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
