चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार, राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तुंग झेप
चोपडा,दि.२१(प्रतिनिधी)येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वी तील विद्यार्थी दुर्गेश वासुदेव पाटील याने राज्यस्तरीय इंग्रजीच्या ऑलिंपियाड या परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे. यासह अकरा विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तर दुर्गेश वासुदेव पाटील यास प्रमाणपत्र, ट्रॉफी, गोल्ड मेडल आणि एक हजार रुपये चा धनादेश देण्यात आला आहे.
तसेच इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी दुर्वा श्रीकांत पाटील हिने जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्या समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय प्रथम जिल्हास्तरीय प्रथम, विभाग स्तरीय प्रथम आणि शेवटी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. दूर्वा पाटील हीस इंग्रजीचे शिक्षक चंद्रकांत कदम,एम.एस.पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. सदर विद्यार्थिनीस मेडल, प्रमाणपत्र आणि एक हजार रुपयांचा धनादेश मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. या दोघेही विद्यार्थ्यांचा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड संदीप पाटील,सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते दि. 21 रोजी सकाळी दहा वाजता सत्कार करण्यात आला. यावेळी समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ.अनिल सूर्यवंशी, संदीप देवरे, मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे, पर्यवेक्षक संजय सोनवणे, इंग्रजीचे शिक्षक सि.टी. कदम, विजय सोनवणे, नवी खा. बिस्मिल्ला खा. हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री एन. एस. सोनवणे यांनी संबंधित गुणवंत विद्यार्थ्यांबाबत प्रास्ताविक सादर केले आणि आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संजय सोनवणे यांनी केले.
