धानोरा विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आषाढी वारीने गाव दुमदुमले

 धानोरा विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आषाढी वारीने गाव दुमदुमले

धानोरा,ता.चोपडा (प्रतिनिधी) : झि तो महाजन माध्यमिक व ना भा पाटील ज्यूनियर कॉलेज धानोरा विद्यालयात प्राचार्य के एन जमादार यांच्या मार्गदर्शनात विद्यालयाच्या हरितसेना विभागाच्या वतीने हरितसेना शिक्षक देविदास महाजन यांनी आषाढी वारी निमित्ताने ग्रंथ दिंडी, वृक्ष दिंडी व प्रभात फेरीचे आयोजन उत्साहात पार पाडले.

      विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, केंद्रप्रमुख श्री प्रमोद काकुळदे, विशेष शिक्षक योगेश्वर पाटील व उपस्थित शिक्षकांनी विठोबा, रुक्माई, ग्रंथ व वृक्ष पूजन करून पालखीला खांदा लावला. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदाय व महाराष्ट्राचे दैवत पांडुरंग विठोबा रुक्मिणी सह संत तुकाराम, संत माऊली ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत मीराबाई, संत गोरोबा, संत चोखामेळा आदी सर्व संतांचा पेहराव केला होता. टाळ व मृदुंगाच्या गजरात छोटी छोटी भजन विद्यार्थ्यांनी गायली. सर्व विद्यार्थ्यांनी पांढरा सदरा, धोती डोक्यावर टोपी व कापली अष्टगंध बुक्क्याचा तिळा तर मुलींनी नऊवार साडी घालून कपाळ गंध तिळा लावून वारीची शान वाढविली. अनेक मुलींनी तुळशी वृंदावन डोक्यावर तर मुलांनी विविध वृक्षांची रोपट्यांची कुंडी हातात घेतली होती. संपूर्ण धानोरा गावातून आषाढी वारी काढण्यात आली. सर्वात भारी पंढरीची वारी, जय जय रामकृष्ण हरि, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, झाडे लावा झाडे जगवा, चला हो चला वारीला चला, साक्षर वारी लई भारी या सारख्या घोषणांनी विद्यार्थ्यांनी गाव दणाणून सोडला. अनेक माता भगिनींनी ग्रंथ, वृक्ष दिंडीचे, विठोबा रुक्मिणी व  संतांचे पूजन केले. अनेक विद्यार्थ्यांनी हातात ध्वज व घोषवाक्य फलक घेतली होती. विद्यार्थ्याचा दिंडीचा पेहराव, जनजागृती पर घोषणा, चौका चौकात रिंगण सोहळा व बाल वारकरी दिंडी सोहळा बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला व चौकाचौकात लोकांची गर्दी झाली.

          सदर ग्रंथ व वृक्ष दिंडी प्रभात फेरी आयोजन निमित्ताने विद्यालयाच्या हरितसेना विभाग व सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, जेष्ठ संचालक बी एस महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, प्राचार्य के एन जमादार सर, सर्व पालक व ग्रामस्थांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडाशिक्षक देविदास महाजन, सिराज तडवी, सी बी सोनवणे, ए पी शिरसाठ, मच्छिंद्र महाजन, हिमांशु चौधरी, इ टी भामरे, वाय व्ही बाविस्कर, ए पी पाटील, जे ए महाजन मॅडम, पंकज महाजन, भूपेंद्र परमार, राजेंद्र पाटील, देविदास साळुंखे, संतोष कोळी, कुलदीप महाजन यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने