सार्वजनिक विद्यालय अडावद तर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

 सार्वजनिक विद्यालय अडावद तर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

अडावद ता.चोपडा दि.२६(प्रतिनिधी): पवित्र आषाढी एकादशीचे औचित्य साधून  येथील  सार्वजनिक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय  यांच्यातर्फे अडावद गावात दिंडी सोहळ्याचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक जे कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सर्वप्रथम अडावद पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे  उपनिरीक्षक अशोक नांगरे  जॉईन  सेक्रेटरी मिनाबाई देशमुख, संचालक शांताराम कोळी , हरिष पाटील प्रमोद देशमुख  केंद्र प्रमुख आधार  पानपाटील विशाल पाटील भूषण बाविस्कर  मुख्याध्यापक   अशोक कदम व मान्य वरांच्या   शुभहस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल  व रुक्मिणी यांचे पूजन व माल्ल्यार्पण करण्यात आले.  विद्यालयाचे मुख्याध्यापक . ए. जे. कदम पर्यवेक्षक एम जी पाटील  यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन विद्यालय व संस्थेतर्फे स्वागत केले, त्यानंतर अडावद गावात शिस्तबद्ध रित्या  देखणा असा दिंडी सोहळा काढण्यात आला.

     बालगोपाळांची विठू रुक्माई ची वेशभूषा, पालखीची सजावट, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आणि विद्यार्थिनींचे टाळ पथक गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. गावात ठिकठिकाणी विठुरायाच्या पालखीचे ग्रामस्थ दर्शन घेत होते विठू नामाच्या जयघोषात, ढोल ताशाच्या चालीवर, टाळ आणि लेझीमच्या गजरात देखना असा दिंडी सोहळा पार पडला. सालाबाद प्रमाणे माऊलींच्या पालखीची विठ्ठल मंदिराजवळ पूजा करण्यात आली व . गोटू दहाड यांच्याकडून विद्यार्थ्यांना उपवासाची राजगिऱ्याचे लाडू प्रसाद म्हणून वाटण्यात आले.

    सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थिनींचे   लेझीम  पथक यंदाच्या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले.    तसेच यावेळी दिव्याग विद्यार्थ्यानी उत्साहाने सहभाग घेतला  यावेळी  ग्राम पंचायत तर्फे  मनोहर पाटील  यांनी मुख्याध्यापक अशोक कदम यांचा उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला  याबद्दल संस्थचे अध्यक्ष सेक्रेटरी व संचालक, गावातील पालक बंधू भगिनींनी आणि अडावद ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक  केले.

    दिंडी सोहळा व लेझीम पथकाचे नेतृत्व  सचिन पाटील      आर टी मोरे    नितीन महाजन यांनी   केले. तसेच विद्यालयाचे शिक्षक पर्यवेक्षक व    शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले तर अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी    शेषराव तोरे भूषण चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने