लासुर येथे महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा
चोपडा दि.२६(प्रतिनिधी) : लासुर येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मार्फत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गावातून टाळ मृदुंग व ढोल ताशाच्या गजरात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत वारीची परंपरा जपली जावी व विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची शिदोरी रुजावी या हेतूने हरिनामाचा गजर करत भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
गावातील मुख्य बाजार चौकात रिंगण आयोजित केले यावेळी विद्यार्थिनींनी भक्ती गीतांवर अतिशय सुंदर असं लेझीम सादर केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री आर एस पाटील उपप्राचार्य श्री आर एल बाविस्कर पर्यवेक्षक श्री एस जी पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी दिंडीचे नियोजन करून विद्यार्थ्यांबरोबर दिंडीत पारंपारिक वेशभूषेत सहभाग घेतला.
