समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि रोटरी क्लब ऑफ, चोपडा आयोजित विद्यार्थिनींसाठी "आरोग्य आणि पोषण आहार" याविषयावरील व्याख्यान संपन्न

 समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि रोटरी क्लब ऑफ, चोपडा आयोजित 

विद्यार्थिनींसाठी "आरोग्य आणि पोषण आहार" याविषयावरील व्याख्यान संपन्न

चोपडा दि.२६(प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 रोजी भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि रोटरी क्लब ऑफ, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय "युवतींचे आरोग्य आणि पोषण आहार" याविषयावर व्याख्यानाचे आयोजन  भाऊसो. शिवराम शामराव पाटील विद्यामंदिर,चहार्डी या शाळेमध्ये करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाच्या उदघाट्न प्रसंगी मा. प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, (प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), मा. संजय बारी,(अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ, चोपडा, डॉ. मनीषा महेश लाडे, (लाइफ केअर क्लिनिक, चोपडा), प्रा. डॉ. संबोधी देशपांडे (समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), मा. शरद जगताप (मुख्याध्यापक, शा. शि. पाटील विद्यामंदिर, चहार्डी), मा. रामकन्या लांडगे मॅडम, मा. स्वाती चौधरी मॅडम, मा. भूषण कोळी, चहार्डी इ. मान्यवर उपस्थित होते. 

न संजय बारी सर (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ चोपडा) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समाजकार्य महाविद्यालय, चोपडा समुदायाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवित असते. तसेच रोटरी क्लब ऑफ, चोपडा ही समुदायाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवित असतात. शाळेमधील 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थिनींसाठी "युवतीचे आरोग्य आणि पोषण आहार" या विषयावर डॉ. मनीषा लाडे  मॅडम आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. भविष्यातही असेच अनेक विविध उपक्रम रोटरी क्लबच्या माध्यमातून राबविले जातील अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. यानंतर प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर सर,(समाजकार्य महाविद्यालय, चोपडा) यांनी या व्याख्यानाचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यावा. तसेच आपल्या मनातील प्रश्न मनमोकळेपणाने विचारवेत, त्याविषयी डॉक्टरांशी मनमोकळेपणाने संवाद साधावा, याविषयी त्यांनी विद्यार्थिनींना  आवाहन केले आणि पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

यानंतर डॉ. मनिषा लाडे मॅडम (लाइफ केअर क्लिनिक, चोपडा) यांनी विद्यार्थिनींना आपला सकस आहार, पोषण आहार कशा पद्धतीने असावा याविषयी सखोल माहिती विद्यार्थिनींना दिली. यामध्ये त्यांनी पालेभाज्या, कडधान्य, डाळी यांचा आहारात आपण वापर केला पाहिजे. पिझा, पास्ता, मॅगी इ. फास्ट फूड मधून आवश्यक ती पोषण तत्वे आपल्या शरीराला मिळत नाहीत. तसेच सकाळी आपण नाश्ता करून शाळेमध्ये आले पाहिजे. दुपारचा डबा ही आपण आणला पाहिजे. आपले जेवणाचे ताट हे विविध रंगांनी भरलेले असले पाहिजे आणि त्यानुसारच आपण आहार घेतला पाहिजे. याविषयी त्यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली. तसेच आपले आरोग्य कशा रीतीने आपण निरोगी ठेवले पाहिजे.   किशोरवयीन वयामध्ये येणाऱ्या विविध समस्या, मासिक पाळी विषयीचे प्रश्न इत्यादी संदर्भात त्यांनी सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले. तसेच विद्यार्थिनींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही त्यांनी याप्रसंगी दिली. आपले आरोग्य जर आपण चांगले ठेवले तर निश्चितच तुमचं स्वतःचंही आरोग्य आणि  येणाऱ्या पुढच्या भावी पिढीचेही आरोग्य चांगल्या पद्धतीने तुम्ही राखू शकाल याविषयी त्यांनी विद्यार्थिनींना सखोल माहिती दिली. 

 यानंतर प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेमधील इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत केली. यामध्ये त्यांनी 1) अश्विनी संभाजी बारेला आणि 2) ललिता शरद कोळी या दोन विद्यार्थिनींना प्रत्येकी 5000/- रु. चा चेक, एक पुस्तक आणि पेन भेट दिले. तसेच या सर्व विद्यार्थिनींना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाऊसो. शामराव शिवराम पाटील विद्यामंदिर, चहार्डी येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ चोपडा, भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने