देवगिरी कल्याण आश्रम व जळगांव ची सेवारथ संस्थेकडून चोपडा तालुक्यात 3 हजार अंबा वृक्षांचे वाटप ; वृक्षसंगोपनावर विशेष भर

 देवगिरी कल्याण आश्रम व जळगांव ची सेवारथ संस्थेकडून चोपडा तालुक्यात 3 हजार  अंबा वृक्षांचे वाटपवृक्षसंगोपनावर विशेष भर


चोपडा,दि.२६ ( प्रतिनिधी)पर्यावरण संवर्धनासोबतच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवगिरी कल्याण आश्रम, चोपडा व सेवारथ संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात तीन हजार केशर आंबा वृक्षांचे वाटप व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन महाराष्ट्र वनभूषण पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते मुळ्यावतार येथे उत्साहात झाले.

यावेळी सेवारथ संस्थेच्या नीलिमा सेठीया व डॉ. अमित भंगाळे यांच्या सह जळगांव येथील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. वृक्षांचे केवळ वाटप न करता त्यांचे भविष्यात योग्य संगोपन व संवर्धन व्हावे, यासाठी निवृत्त कृषी अधिकारी डॉ भोकरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वृक्ष स्वीकारणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याकडून प्रति वृक्ष नाममात्र केवळ २० रुपये शुल्क घेण्यात आले, जेणेकरून वृक्षाची किंमत समजून त्याचे जतन करण्याची भावना निर्माण होईल असा उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पद्मश्री चैत्राम पवार म्हणाले, "वृक्षारोपण  आणि संवर्धन ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपण वृक्षांवर प्रेम केले तर ते आपल्याला आयुष्यभर प्राणवायू, सावली, पर्यावरणाचे संरक्षण  सोबतच नियमित आर्थिक उत्पन्न देतील. नोंदणी केलेल्या प्रत्येक जनजाती कुटुंबाला उच्च दर्जाची किमान 5 केशर आंब्याची रोपे पुरवण्यात आली आहेत प्रत्येक कुटुंबाने लावलेले झाड जगविण्याचा संकल्प करावा."

वृक्षांचे संगोपणा साठी नियमित मार्गदर्शन  मिळण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली 

या कार्यक्रमास सुमारे ३०० नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी श्री दत्ता पावरा, श्री दयाराम बारेला, श्री धनंजय भादले,  श्री पिंटू पावरा, श्री प्रेमसिंग बारेला,  श्री भाईदास सोनवणे, श्री अजय रोडगे पाटील, श्री किशोर चौधरी,  श्री श्याम सोनार, प्रा. अशिष गुजराती,  श्री डॉ देसले, श्री प्रकाश माळी, श्री संदीप पाटील, डॉ. राजीव सोनवणे श्री डॉ  पंकज अमृतकर, श्री डॉ सुनील जैन आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने