आषाढी एकादशी निमित्त शाळकरी दिंडीचे आयोजन

 आषाढी एकादशी निमित्त शाळकरी दिंडीचे आयोजन


लासूर ता. चोपडा दि.२६(प्रतिनिधी) : येथील मं. गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामार्फत आषाढी एकादशीचा पार्शवभूमीवर शुक्रवारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गावातून टाळ व ढोल ताशाचा गजरात वारकरी संप्रदायाचा पोषाकात मोठ्या उत्साहाने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी दिंडी विद्यालयातून, राम मंदिर मार्गाने 

हरीनामाचा गजर करत बाजार चौकात येऊन लेझीम पथकातील मुलींनी रिंगण आयोजित केले .विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ज्ञानेश्वर माहूली तुकाराम ,या गजरात लेझीम नृत्य सादर केले.या दिंडी आयोजनात विद्यालयाचे प्राचार्य आर एस पाटील, उपप्रचार्य आर एल बाविस्कर व पर्यवेक्षक एस जी पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधूनी व  विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी  दिंडीचे नियोजन करून त्यात सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने