दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे होणारे उपद्रव तसेच मानव-श्वान संघर्ष याबाबत जनजागृती उपक्रमाचे आयोजन
चोपडा,दि.१८(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे होणारे उपद्रव तसेच मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाच्या सूचना फलकावर जनजागृतीपर छायाचित्रे व संदेश प्रदर्शितकरण्यात आले होते. या फलकाचे अनावरण प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ , उपप्राचार्य ए. बी. सूर्यवंशी, ज्युनिअर विभागाचे श्री. बोरसे सर, डॉ. विशाल हौसे, डॉ. आर.आर. पाटील, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एच. जी. सदाफुले, डॉ . मयूर सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना माहितीपर पत्रकांचे (पॅम्प्लेट) वाटप करण्यात आले. महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये जनजागृती फलक लावून विद्यार्थ्यांना सुरक्षितता,भटक्या जनावरांबाबत घ्यावयाची काळजी आणि मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राणीशास्त्र विभागप्रमुख व प्राणी जन्म नियंत्रण नोडल अधिकारी डॉ. एच. जी. सदाफुले यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी जागरूक नागरिक म्हणून अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचेआवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयूर एम. सोनवणे यांनी केले तर आभार अदिती मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी पवार, रामेश्वरी पाटील, भरत भालेराव यांचे सहकार्य लाभले.यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
