खोटा व्हिडिओ व्हायरल करून एफडीएकडे तक्रारीची धमकी देऊन पैशांची मागणी ! निर्मल दूध डेअरीचे संचालक प्रल्हाद पाटील यांची माहिती

 खोटा व्हिडिओ व्हायरल करून एफडीएकडे तक्रारीची धमकी देऊन पैशांची मागणी ! निर्मल दूध डेअरीचे संचालक प्रल्हाद पाटील यांची माहिती 


चोपडा,दि.१८ ( प्रतिनिधी ): शहरातील निर्मल दूध डेअरीच्या दुधाचा खोटा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनलला प्रसारित करून डेअरीची बदनामी केली तसेच संबंधित तक्रारदाराने डेअरी मालकाची सामाजिक बदनामी व मानसिक छळ केला तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. असा आरोप निर्मल दूध डेअरीचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केला.

तक्रारदाराने आमच्या निर्मल दूध डेअरीवरून  दूध घेतल्याचा बनाव करून भेसळयुक्त दुधाचा खोटा व्हिडीओ बनवून सामाजिक बदनामी केली परंतु संबधित तक्रारदाराने आमच्या निर्मल दूध डेअरीवरून त्या दिवशी दूध घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले नाही.गेल्या वीस वर्षातआमच्या निर्मल दूध डेअरीवरील दुग्धजन्य पदार्थां संदर्भात कोणतीही तक्रार नाही.तसेचआम्ही दर तीन महिन्यांनी प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतो.असा पारदर्शक कारभारअसतांना देखील अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची धमकी देऊन पैशाची मागणीकरून खोटे व्हिडीओ तयार करून सोशल मीडिया व टीव्ही चॅनलला प्रसारित करून डेअरीची बदनामी केली तसेच अशा खोट्या बातम्यांवर ग्राहकांनी विश्वास ठेऊ नये असे निर्मल दूध डेअरीचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने