पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

 पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

चोपडा,दि.१८(प्रतिनिधी) : पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा येथे इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेत तसेच MHT-CET (PCB/PCM) प्रवेश पात्रता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतून रिया दिलीप जैस्वाल (88.33%)खुशी चंद्रशेखर सोनवणे (88.17%), अवनी अजित वानखेडे (85.5%) आणि कला शाखेतून करीना सलीम तडवी (77.83%), दिपाली भरत कुमावत (70.67%), प्रेरणा नाना बाविस्कर (69.17%), दिव्या प्रदीप पाटील (69.17%), यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. 

 *आय आय टी दिल्ली येथे प्रवेश पात्र ठरलेला ओम महेंद्र पाटील* याचा ही पालकांसह सत्कार करून गौरविण्यात आले.प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात एमएच सीईटी 90 परसेंटाईल प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रेहान तेली, धनंजय चौधरी, हर्षल कोळी, आदित्य पाटील, अंजली पाटील, वैभव पेंढारे, धनंजय रमेश पाटील, तनवीर तेली, करिष्मा पाटील, रिया जैस्वाल, खुशी सोनवणे, अवनी वानखेडे, समीक्षा चौधरी, भावेश महाजन, श्रद्धा पाटील, यज्ञिका पाटील, निखिल खारोल, कावेरी पाटील, मयूर मगरे, लोकिता पाटील, परीक्षित पाटील, दिपक बाविस्कर, ऋषीराज बाविस्कर, स्नेहल पाटील, भूमिका चौधरी, कृतिका राणे, मोहित पिंगळे, हिमांशू पाटील, खुशवंत शिंदे, दिव्या पाटील, अमित हिवरकर, हिमांशू पाटील, नेहा पाटील, पुर्वजित महाजन, सानिका पाटील, हर्षल महाजन या गुणवंतांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंकजभैय्या बोरोले हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास जोपासावा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नंदलाल वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.दिवाकर बाविस्कर यांनी केले

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  वैशाली चौधरी, अजय सैंदाणे, योगराज रायसिंग, जितेंद्र महाजन,सौरभ कुलकर्णी, संजय भादले या शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने