डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने घोडगाव व गणपूर येथे वृक्षारोपण
गणपुर ता.चोपडा दि.१७(प्रतिनिधी)गणपूर ता चोपडा येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या मार्गदर्शनाखाली घोडगाव (ता चोपडा) येथील आस्था नगर मध्ये 70 व गणपुर (ता चोपडा)अनेर नदी शेजारील स्मशानभूमीत 20 वृक्षांची रोपे लावून वृक्ष लागवड करण्यात आली.प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात हा उपक्रम राबविण्यात येतो. आणि त्या रोपांचे संवर्धन व संगोपन केले जाते. रोपे लागवडी वेळी संस्थेचे 76 श्री सदस्य मिळून उपस्थित होते.विविध कामातून त्यांनी सहभाग नोंदवला.
