मानव सेवा केंद्र इमारत भूमिपूजन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

 मानव सेवा केंद्र इमारत भूमिपूजन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न


चोपडा दि.१७(प्रतिनिधी)- वेले येथे  अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या  मानव सेवा केंद्र या संस्थेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन  चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात संपन्न झाले. भूमिपूजन प्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी श्रीफळ वाढवून तसेच टिकाव मारून नूतन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या निस्वार्थ सेवाकार्याचे कौतुक करत, बेवारस व निराधार मनोरुग्णांना सुरक्षित निवारा, उपचार आणि सन्मानाचे जीवन देण्यासाठी उभारली जाणारी ही इमारत समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

संस्थेच्या या नूतन प्रकल्पामुळे बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून, समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या सेवाकार्यात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुनर्वसनासाठी अधिक सक्षम

याप्रसंगी वेले आखातवाडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींसह शामसिंग परदेशी, मंडळधिकारी मनोज साळुंखे, भूषण पाटील, माजी उपसरपंच विनोद पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, मनोज चित्रकथी, अपनाही घर या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संचालक अजय जोहरी, विजय पाटील, दिनेश पवार, पत्रकार बांधव तसे संस्थेचे समन्वयक संदीप ओली आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने