आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नात अनेर धरणाचे पाणी " मे " महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नदीत सोडणार.. ♦️ चोपडा तालुक्यातील १७ गावातील पाण्याची भू जल पातळी वाढणार

 आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नात अनेर धरणाचे पाणी " मे " महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नदीत सोडणार.. 

♦️ चोपडा तालुक्यातील १७  गावातील पाण्याची भू जल पातळी वाढणार


चोपडा,दि.20(प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यात पाण्याची पातळी दिवसें दिवस खालावत चाललीअसल्याने शेतकरी राजा चिंतातूर झाला आहे .ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी  अनेर नदीत धरणाचे पाणी सोडल्यास  शेतकऱ्यांच्या विहिरीं बोअरवेलची पाणी  पातळी वाढण्यास मोलाची ठरेल त्यासाठी धुळे जिल्हाधिकाऱी व पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी  त्वरीत लक्ष धरणाचे पाणी नदीत सोडावे अशी मागणी एका पत्रकान्वये केली आहे.त्यानुशंगाने " मे"महिन्याचा पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली असल्याने आमदारांच्या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे.

 अनेर नदी काठावरील चोपडा तालुक्यातील १७ गावांमध्ये शेतातील व गावातील पाणीपुरवठा कुपनालीकांची पाणी पातळी दिवसेंदिवस खालवत असून ऐन उन्हाळयात अनेर काठावरील शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाणीपुरवठा करतांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. अनेर धरणात सध्या ५९ टक्के इतका पाणी साठा असून अनेर नदी काठयावरील गावांची पाणीपातळी वाढण्यासाठी अनेर धरणाचे पाणी अनेर नदीत सोडावे अशी ग्रामस्थांची व शेतक-यांची मागणी आहे.

तरी सदरचा बाबीचा विचार करता अनेर धरणाचे पाणी त्वरीत अनेर नदीत सोडावे जेणे करुन होणारे नुकसान थांबविणे शक्य होईलअसे आ.प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कार्यकारी अभियंता  पाटबंधारे विभाग धुळे यांच्याकडे स्पष्ट केले होते.त्या पत्राची दखल घेत "मे"महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेर नदीत पाणी सोडल्यात येत आहे त्यामुळे चोपडा तालुक्यातील १७गावातील शेतकऱ्यांना व नागरीकांना  या पाण्याचा फायदा होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने