गटनेते पियुष चौधरी व नगरसेवका रुकसारबी सऊद बागवान यांच्या पुढाकारात.. चोपडा प्रभाग क्रमांक ५ मध्ये नाला साफ सफाई जोरात
चोपडा दि.१४(प्रतिनिधी) :साने गुरुजी वसाहत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे सांडपाणी तुंबले होते. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या समस्येची गंभीर दखल घेत प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेविका श्रीमती रुखसार बी. सऊद बागवान आणि पीयूष चौधरी यांनी पुढाकार घेऊन विशेष स्वच्छता मोहीम राबवून साफ सफाई करून घेतल्याने प्रभागवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वच्छतेसाठी जे.सी.बी. (JCB) मशीन आणि अग्निशमन दलाच्या बंबाचा वापर करण्यात; येऊन सफाई कामगारांच्या मदतीने नाल्यांमधील अडथळे दूर करून साचलेला गाळ व कचरा पूर्णपणे उपसण्यात आलाआहे.त्यामुळे नाले प्रवाहीत झाल्याने परिसरात पसरलेली दुर्गंधी कमी झाली आहे .नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे."नागरिकांचे आरोग्य हीच प्राथमिकता समजून केवळ आजच नव्हे, तर भविष्यातही प्रभागातील स्वच्छतेबाबत आम्ही कटिबद्ध आहोत," असे आश्वासन यावेळी नगरसेवकांनी दिले.
नागरिकांनी मानले आभार
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या तत्पर कामाबद्दल आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे,नगराध्यक्षा सौ. नम्रताताई पाटील,नगरसेविका सौ. रुखसार बी. सऊद बागवान,गटनेते व नगरसेवक पीयूष चौधरी यांचे जाहीर आभार मानले आहेत.नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये जनहिताची जोरदार कामे सुरू आहेत स्वच्छता, व पाणीपुरवठ्या ची खास काळजी घेण्यात येत असल्याने प्रभाग वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
