चोपडा नगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.. नगराध्यक्ष सौ नम्रता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन
चोपडा,दि.१४(प्रतिनिधी) येथील नगरपालिका सभागृहात आज 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साह पूर्ण वातावरण करण्यात आली.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सौ नम्रता ताई सचिन पाटील व स्वच्छता समिती सभापती रमेश शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून केले. यावेळी बाबासाहेबांच्या आदर्श विचार आज समाजात रुजवण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष पंकज बोरोले, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, पाणीपुरवठा सभापती किशोर चौधरी, स्वच्छता समिती सभापती रमेश शिंदे, नगरसेविका रुकसार बी बागवान, नगरसेवक प्रवीण बाबा देशमुख,नगरसेवक अलकारी, कॉन्ट्रॅक्टर दीपक महाजन, सामाजिक कार्यकर्ते सऊद बागवान, सचिन पाटील, नगर अभियंता दिगंबर वाघ, नगरसेवक अमोल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिसर, कार निरीक्षक प्रणव पाटील,ईलेक्ट्रीक अभियंता प्रमोद पाटील, पाणीपुरवठा अभियंता मोरे, स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंखे, यांच्यासह नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
